आम्ही भारताचे लोक , भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकास,
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय,
विचार, अभीव्यक्ती,विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत आज
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
1] सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे - ना. ए. पालखीवाला.
2] नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित.
3] 42 वि घटना दुरुस्ती 1976 नुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष , एकात्मता यांचा सरनाम्यात समावेश.
4] सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायचे आदर्श रशियन राज्यक्रांतीतून (1917) घेतले.
5] स्वातंत्र्य,समता,बंधुता हे आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीतून (1789-1799) घेतले.
* सरनामा घटनेचा भाग आहे की नाही :
1] बेरुबारी युनियन खटला (1960): सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - सरनामा घटनेचा भाग नाही
2] केशवानंद भारती खटला (1973): SC ने निर्णय बदलावला - सरनामा हा घटनेचाच भाग.
3] भारतीय जीवन विमा निगम खटला (1995) : सरनामा घटनेचा एकात्मिक भाग.
** कलाम 368 नुसार सरनाम्यात दुरुस्ती करता येते का ?
हा प्रश्न पहिल्यांदा केशवानंद भरती खटला (1973) मसध्ये पडला.
सरनामा हा घटनेचाच भाग आहे यात कलमानुसार दुरुस्ती करता येते पण मूळ वैशिष्ट्ये व घटनेची मूळ चौकट यात बदल करता येणार नाहीत.
** 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार एकदाच सरनाम्यात दुरुस्ती करण्यात आली. समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता यांचा समावेश.
0 Comments