राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये
1] विस्तृत लिखित घटना- 1949 मध्ये सरनामा, 395 कलमे, आठ परिशिष्टे होती. आता 465+ कलमे आणि बारा परिशिष्टे आहेत
२] विविध स्त्रोताकडून उसनवारी
स्त्रोत वैशिष्ट्ये
भारत सरकारचा कायदा 1935 संघराज्य शासन पद्धती, राज्यपाल, न्यायव्यवस्था, लोकसेवा
आयोग, आणीबाणी प्रशासनिक तपशील.
ब्रिटिश राज्यघटना संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ, एकेरी
नागरिकत्व, आदेशाचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार,
द्विगृही कायदेमंडळ
अमेरिका मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्याय व्यवस्था, राष्ट्रपती महाभियोग,
सर्वोच्च व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची पद्धती उपराष्ट्रपती
पद
कॅनडा प्रबळ केंद्र सत्ता, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्राकडून राज्यपालाची
नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र
आयर्लंड मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशन, राष्ट्रपती
निवडणूक पद्धत
ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, संसदेचे संयुक्त अधिवेशन
जर्मनी आणीबाणीच्या काळातील मूलभूत हक्काचे निलंबन
सोवियत युनियन(रशिया) मूलभूत कर्तव्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचे आदर्श
फ्रान्स प्रजासत्ताक पद्धती, स्वातंत्र्य समता व बंधुता
दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्ती, राज्यसभा सदस्य निवडणूक,
जपान कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया
3] लवचिकता ताठर यांचा समन्वय
4] स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था
5] मूलभूत हक्क भाग-3 मध्ये समावेश
समतेचा हक्क(कलम 14 ते 18)
स्वातंत्र्याचा हक्क(कलम 19 ते 22)
शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 ते 24)
धार्मिक स्वातंत्र्य(कलम 25 ते 28)
संस्कृती व शैक्षणिक हक्क(कलम 29 30)
घटनात्मकउपाय योजना (कलम 32)
6] राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
नाविन्यपूर्ण, घटनेच्या भाग चार मध्ये समाविष्ट
7] धर्मनिरपेक्ष राष्ट्र
1976 42 वी घटनादुरुस्ती नुसार सरनाम्यात समावेश
8] सार्वत्रिक प्रौढ मताधिकार
61 वी घटना दुरुस्ती 1988 नुसार वयोमर्यादा 21 वरून 18 वर
9] एकरी नागरिकत्व
10] स्वतंत्र संस्था
निवडणूक आयोग, भारताचा महालेखापरीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग.
11] आणीबाणी तरतुदी
राष्ट्रीय आणीबाणी - कलम 352
राष्ट्रपती राजवट - कलम 356
आर्थिक आणीबाणी - कलम 360
12] त्रिस्तरीय सरकार - केंद्र,राज्य, स्थानिक स्वराज्य
0 Comments