सातवाहन घराणे महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास

नमस्कार आज आपण महाराष्ट्र आणि आणि त्याचा इतिहास याच्या पुढचा भाग पाहणार आहोत.


सातवाहन कालखंड



इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग आणि कण्व यांचे  वर्चस्व निर्माण झाले. महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा उगम झाला. सातवाहनांच्या 30 राजांनी सुमारे 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रात सर्वप्रथम दर्शवणारे व महत्त्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे  होते .



सातवाहनांचे मूळ स्थान व कालखंड



सातवाहनांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते तर डॉक्टर मीराशींच्या मताप्रमाणे सातवाहनांचा मूळ प्रदेश विदर्भ होय. उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनांचे मुळस्थान महाराष्ट्र असून पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती .




सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे



सिमुक हा  सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय. सातकर्णी प्रथम राजा सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला. त्याने नाशिक जिंकून घेतले व 18 वर्षे राज्य केले राजा कृष्णच्या नंतर  मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात .

प्रथम सातकर्णी यांच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राज्ये आपल्या नावासमोर सात वाहनाचा शब्दप्रयोग न करता सातकर्णि करणे असाच करू लागले

राजा हाल याने प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गाथासप्तशती हा प्राकृत काव्यसंग्रह  लिहिल्याची  माहिती मिळते. गौतमीपुत्र सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णीने सत्तेचे पुनर्जीवन केले. माळव यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्ती मध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना त्रिसमुद्र्पोयपीतवाहन असा करतात . याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे असा होतो


यज्ञ श्री सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होय यांनी शकांनी जिंकून घेतलेली प्रदेश परत जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले


सातवाहन कालीन प्रशासन व्यवस्था



दोन हजार वर्षांपूर्वी वाहतुकीच्या सोयी नसताना सातवाहन राजांनी सोमवारी 460 वर्षे उत्कृष्ट प्रशासनामुळे महाराष्ट्र राज्य केले राज्य आमात्य सचिव अशा मंत्र्यांची नेमणूक राज्याच्या मदतीसाठी केली सातवाहन कालीन प्रशासनातील शेवटचा घटक उपक्रम होय गावच्या प्रमुखास ग्रामणी ग्रामपती ग्रामफुट म्हटले जाई.

***************************************************************************

Post a Comment

0 Comments