मध्ययुगीन महाराष्ट्र


                               महाराष्ट्राचा इतिहास

मध्ययुगीन महाराष्ट्र

यादव कालखंड :

महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच कालखंडात मराठी भाषेतील वांग्मय निर्मितीला सुरुवात झाली. यादव राज्यकर्त्यांना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते. पाचवा सिंघम द्वितीय, कृष्ण देव, महादेव रामचंद्र ,यासारखे कर्तबगार राज्य हेमद्री सारखी विद्वान प्रधान भास्कराचार्य व देऊन सारखे महान पंडित या काळात होऊन गेले.


राजकीय परिस्थिती :

   कल्याणीच्या चालुक्याच्या पाडावानंतर दक्षिणेत  तीन प्रमुख सत्तांचा उदय झाला. कर्नाटकात होयसळ सत्ता, आंध्रात काकतीय सत्ता, आणि महाराष्ट्रात यादव सत्ता. यादवांचा प्रधान हेमाद्री यांनी चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला यामध्ये त्यांनी यादव घराणे यांची वंशावळ दिलेली आहे.
   सुबाहू चा दृढप्रहर पुत्र हा या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो. गुजरात मधील द्वारकेतून तो दक्षिणेत आला श्रीनगर (सिन्नर, जिल्हा नाशिक) येथे त्यांनी आपली राजधानी वसवली असे वर्णन हेमाद्री यांनी केलेले आहे. मुलगा सेउनचन्द्र  यांनी सेऊणपूर नावाचे शहर वसवले पाचवा भिल्लम  यादवने राज्यातील श्रीवर्धन म्हणजेच परंडा मंगलअष्टक म्हणजे मंगळवेढा आणि लष्करी कारवाई करून घेतली थोड्याच वेळात यादव राजघराण्याची सार्वभौम सत्ता निर्माण केली देवगिरी येथे आपल्या राज्याची राजधानी स्थापन केली
  जय दोघी नंतर सिंघम द्वितीय हा यादव करण्यात पराक्रमी सम्राट होऊन गेला सिंघन  यांनी खोलेश्वर यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीला प्रशासनात अधिक वाव दिला खोलेश्वरने वऱ्हाडात शेकडो पाणपोया विहिरी मंदिरे बांधली एलीचपूर येथे विष्णूचे मंदिर बांधले पूर्णा नदीच्या काठी खोलापूर हे नवीन गाव वसवले . सिंघन द्वितीय राजाने मायणी येथे संगमेश्वराचे व शिखर शिंगणापुर येथे महादेवाचे मंदिर बांधले
    कृष्णदेव याच्या काळात देवगिरी वैभवाच्या शिखरावर होते देवगिरीचे वैभव एकूण अल्लाउद्दीन खिलजी यांनी इ.स. १२९६ मध्ये देवगिरीवर स्वारी केली आणि देवगिरी जिंकून घेतले. शंकरदेव उर्फ शिंगण तृतीय हा यादव घराण्यातील शेवटचा सम्राट होय मलिक काफुर ने शंकरदेव चा  इ.स. १३१२ मध्ये पराभव केला आणि यादव यांची सत्ता नष्ट केली
  खिलजी घराणे नंतर देवगिरीवर तुघलक घराण्याची सत्ता स्थापन झाली मोहम्मद बिन तुगलक यांनी इ.स. १३२७ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे आणली व त्यास दौलताबाद हे नाव दिले


आर्थिक परिस्थिती :
  खेडेगावी स्वायत्त होती. यादव कालखंड हा मराठी वांग्मय निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचा होता. गाव एक प्रमुख घटक होता पाटील हा गावाचा प्रमुख होता प्रमुख या नात्याने आपल्या गावाचा सारा वसूल करून सरकार जमा करणे, तथा संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचण्याचे काम पाटलांना करावे लागेल खेडी स्वयंपूर्ण होती आठवडे बाजार होते . व्यापारी पेठा होत्या


धार्मिक परिस्थिती:
  यादव काळापर्यंत वैदिक धर्मात प्रचलित हिंदू धर्माचे पूर्ण स्वरूप प्राप्त झाले होते या काळात महाराष्ट्रात बहुसंख्य लोक हिंदू होते रामायण-महाभारत स्मृती समाजमनावर प्रभाव होता इतर धर्म ही या काळात होते यादव काळात इस्लाम जरी नाममात्र असला तरी हिंदू व मुस्लीम परस्परांच्या जवळ आल्याने त्यांच्या सांस्कृतिकदृष्टया समन्वय झाला होता सर्वधर्मसमभाव हिंदू धर्माची वैशिष्ट्ये निदर्शनास येते.


वांग्मय निर्मिती :

   मराठी निर्मितीच्या दृष्टीने यादव काळा समृद्ध आहे मुकुंदराजांनी विवेकसिंधू परमामृत या ग्रंथाची रचना केले संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व सुमधुर अभंगाची रचना केली संत नामदेवाचे नामदेव गाथा संत चोखामेळा संत सावतामाळी संत विसोबा खेचर संत गोरा कुंभार संत कानोपात्रा इत्यादी सर्व संतांनी मराठी भाषेत सुंदर अर्थपूर्ण अभंगरचना केली चरित्र व श्री गोविंदप्रभू चरित्र ही ग्रंथरचना केली रुक्मिणी स्वयंवर शिशुपालवध या काव्य ग्रंथांची रचना याच काळात मराठी भाषेत झाली

हेमाडपंती मंदिरे :
यादवांच्या दरबारामध्ये हेमाद्री हा प्रधानमंत्री होता त्यांनी स्थापत्य क्षेत्रात सुधारणा केल्या त्याच्या मंदिर स्थापत्य शैलीला हेमाडपंती मंदिरे असे म्हणतात

Post a Comment

0 Comments