महाराष्ट्राचा इतिहास मराठा स्वातंत्र्य युध्द

                                                    मराठा स्वातंत्र्य युध्द 
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर युवराज संभाजी राजे छत्रपती झाले. त्यांना सिद्दी, पोर्तुगीज , व मुघल यांच्याशी संघर्ष करावा लागला. मराठ्यांचे स्वराज्य संपवण्यासाठी खुद्द औरंगजेब मोठ्या सैन्यानिशी
महाराष्ट्रत  आला. संभाजी राजेंच्या शौर्याने शत्रूवर मोठी दहशत निर्माण झाली.  इ.स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे शेख निजामाने (मुखर्ब खान) संभाजी राजे व कवी कलश यांना पकडून हाल हाल करून ठार मारले.

   संभाजी राजानंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यांनी जिंजीला राहून मोघलाविन्रुध्द लढा दिला.  या कमी संताजी-धनाजी या २ सेनापतींनी मुघल सैनाला जेरीस आणले. राजाराम महाराजांनी सरदाराना वतने दिली. परिणामी राज्यात अनेक सत्ताकेंद्रे निर्माण झाली . इ.स. १७०० मध्ये राजाराम महाराजाचा मृत्यू झाला.

   महाराणी ताराबाई :

   महाराजांच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली.  तिने औरंजेबाच्या मृत्यूपर्यंत मुघाला विरुद्ध लढा दिला. या सर्व सोनेरी पर्वला मराठा स्वातंत्र्य संग्राम म्हणतात.


छत्रपती शाहू- महाराणी ताराबाई यांच्यातील यादवी :

   मराठा स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात  संभाजी राजेंच्या पत्नी  येसूबाई व पुत्र शाहू मुघल कैदेत होते. इ.स. १७०७ मध्ये औरंजेबाच्या मृत्यूने मराठा स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झला. दुही निर्माण करण्यासाठी ८ मे १७०७ मध्ये शाहूंची कैदेतून सुटका केली. शाहू महाराष्ट्रात आले. राणी ताराबाई नि तोतया घोषित करून गादी वरील हक्क नाकारला . उभय पक्षात युद्धाची तयारी झाली. दरम्यान शाहूंच्या पक्षातील  बाळाजी विश्वनाथ ने मराठा सेनापती धनाजी जाधवांचे मत परिवर्तन करून शाहुच्या पक्षात घेतेले. भीमा नदीकाठी खेड येथे दोन्ही पक्षात लढाई झाली. शाहूंचा विजय झाला. छत्रपती शहुनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. महाराणी ताराबाई ने कोल्हापूर येथे मराठ्याच्या दुसर्या गादीची स्थापना केली. दोन गाद्यामधील संघर्ष वारणेच्या तहाने संपला.


मराठी सत्तेचा विस्तार
   मराठ्यांच्या यादवीच्या काळात बाळाजी विश्वनाथ छत्रपती शाहूंना अत्यंत प्रामाणिकपणे व विश्वासाने मदत केली. याची जाणीव शाहू महाराजांनी ठेवून बाळाजी विश्वनाथला पेशवेपद दिले. बाळाजी विश्वनाथ यांनी विरोधकांवर मात केली. कान्होजी आंग्रे यासारख्या मातब्बर सेना सरदाराला छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई, सरदेशमुखी इत्यादी हक्क प्राप्त केले .
   बाळाजी विश्वनाथ च्या मृत्यूनंतर शाहूने त्याचा मुलगा बाजीराव यास पेशवे पद दिले. त्यामुळे भट घराण्याकडे पेशवाई सुरू झाली. मराठी सत्तेचा आर्थिक प्रश्न सोडवणे व दूरवरच्या प्रदेशात
साम्राज्यविस्तार करण्याच्या हेतूने बाजीरावाने उत्तरेकडे विस्तारवादी धोरणाचा स्वीकार केला. दाभाडे प्रकरण, छत्रसाल ला मदत आणि दिल्लीवर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्न हे त्यांच्या या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
   दक्षिणेत निजाम, सिद्धी, पोर्तुगीज इत्यादी मराठी शत्रूंवर वचक निर्माण केली. याकामी बंधू चिमाजी अप्पा व इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. पहिल्या बाजीरावानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे झाले. नानासाहेबांनी आपले लक्ष्य दक्षिणेकडे केंद्रित केले. बंगाल प्रांत यावरून पेशवे भोसले संघर्ष ,निजाम, सिद्धि, यांच्याशी संघर्ष निर्माण झाले. याच काळात इंग्रजांनी बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला. काँग्रेसच्या आरमारावर मराठी सत्ता सामर्थ्यशाली आहे हे इंग्रजांनी ओळखून कूटनीतीचा वापर करून मराठ्यांच्या मदतीनेच आंग्रे यांचे आरमार नष्ट केली. नानासाहेबांच्या उत्तर धोरणातून १७६१ मध्ये तिसरे पानिपत युद्ध घडून आले युद्धातील पराभवामुळे  मराठी सत्ता दुबळी झाली.
   पेशव्यांचे मालिकेतील सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणून इतिहासकारांनी पहिला माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला आहे.
निजाम यासारख्या शत्रूंचा पराभव केला. स्वार्थी मराठा सरदार वठणीवर आणले. आग्रा, दिल्ली, पंजाब वर  वर्चस्व स्थापन केले.शहा आलमला पुन्हा दिल्ली च्या तख्तावर बसवले. संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा निर्माण केला. पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा माधवरावांनी पुन्हा  प्राप्त केली. मराठी अजून जिवंत व सामर्थ्यशाली आहेत हे दाखवून दिले. पहिल्या माधवराव पेशवे विषयी इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो की,”पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढी घातक ठरले नाही त्यापेक्षाही अधिक घातक त्यांचा अकाली मृत्यू ठरला’’

   रघोबा दादा यांना पेशवे पद हवे होते परंतु नारायणरावांना ते पद मिळाले .पेशवेपद प्राप्ति वरून नारायणरावांचा खून झाला. नारायणरावाच्या खुनानंतर सर्व सत्ता बारभाई च्या हाती आली. त्यामुळे राघोबादादा नाम मात्र पेशवे बनले. नारायणरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा सवाई माधवराव पेशवे झाले. मात्र राज्यकारभार धोरणी लोकांच्या आला, त्याला यांना बारभाई असे म्हणतात.
   माधवरावाच्या मृत्युनंतर राघोबादादा यांचे पुत्र पेशवे बनले. पण अकार्यक्षम असल्याने राज्यकारभाराची घडी विस्कटली. त्याचा फायदा इंग्रजांनी घेऊन  एक एक बलशाली मराठा सरदारांचा पराभव केला शेवटी इसवीसन १८०२ च्या वसई ठाणे मराठ्यांचे राज्याची शेवट दिशेने वाटचाल सुरू झाली. इसवी सन १८१८ मध्ये मराठी सत्ता कायमची नष्ट झाली

धार्मिक जीवन :
 छत्रपती शिवाजी महाराजांवर बालपणीचे धार्मिक संस्कार झाले होते .त्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदार व सहिष्णू होता. आयुष्यभर मुस्लीम सत्तांच्या विरोधात लढून स्वराज्याचा राज्यकारभार करताना त्यांनी हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला

नाही. रायगड ही राजधानी बनल्यावर तेथे हिंदूंसाठी जे जगदीश्वराचे मंदिर बांधले तसेच मुस्लिमांसाठी मशिद सुद्धा बांधली शिवाजी महाराजांच्या मुसलमान सहकार्‍यांमध्ये इब्राहिमखान, मदारी मेहतर, दौलतखान, काझी हैदर ,इत्यादींचा समावेश होता

सामाजिक व सांस्कृतिक जीवन :
   मराठा काळात बहुतांश लोक खेड्यात राहत. खेड्यांमध्ये दोन विभाग होते गावाच्या लोकवस्तीच्या विभागाला पांढरी, तर लागवडीखाली असलेल्या शेतीस काळी असे म्हणत.

 पेशवेकाळात पोवाडा, लावणी, तमाशा हे मनोरंजनाचे प्रकार अत्यंत लोकप्रिय होते. लेणी स्थापत्य साठी महाराष्ट्राचा प्रसिद्ध आहे तसेच दुर्गस्थापत्य करता सुप्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्यशास्त्राचे चांगले ज्ञान होते. हिरोजी इंदुलकर, आबाजी सोनदेव, मोरोपंत पिंगळे, या स्थापत्यविशारद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यांची निर्मिती झाली. शिवाजी महाराजांनी जलदुर्ग, दुर्ग, व गड बांधले मराठा काळातील मंदिरे स्थापत्य मध्ये हेमाडपंती शैलीची, राजस्थानी शैलीची, मराठी शैलीची मंदिरे उभारण्यात आली.

Post a Comment

0 Comments