सुलतानशाही बहामनी आणि मुगल कालखंड
इसवीसन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण केल्याने इस्लामी
सत्तेचा प्रवेश भारतात झाला इसवी सन तेराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकाच्या
पूर्वर्धापर्यंत सुलतानशाही चे राज्य उत्तर भारतात होते
अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रासह
दक्षिण भारतात या राज्याची स्थापना केली तुघलकाच्या सुरुवातीच्या काळात दक्षिणेतील
काही भाग वगळता संपूर्ण उपखंडावर त्यांचे राज्य होते
भारतात विजयनगरच्या साम्राज्याच्या आणि
बहामनी राज्याच्या प्रभावाखाली हिंदू-मुस्लीम राज्य राज्य करत होती बहामनी
राज्याचा इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक भाग आहे
अल्लाउद्दीन
खिलजी आणि महाराष्ट्र
महाराष्ट्र देवगिरी येथे
यादव यांचे स्वतंत्र व वैभवशाली राज्य होते यादवांची महाराष्ट्रातील राजधानी देवगिरी
अत्यंत वैभवशाली व समृद्ध होती म्हणून अल्लाउद्दीन खिलजीने इसवीसन 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली व यादवांचा पराभव
केला महाराष्ट्रावर मुस्लीम सत्तेची ही पहिली स्वारी होय दक्षिण भारतात मुस्लिम
सत्ता स्थापन करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान होय
मोहम्मद
बिन तुगलक आणि महाराष्ट्र
महाराष्ट्रातील देवगिरी ही साम्राज्याच्या
मध्यवर्ती ठिकाणी असल्याने राज्यकारभारासाठी सोयीची होती शिवाय उत्तर आणि दक्षिण
भारतात सत्ता प्रस्तावित करणे सोपे होते तसेच राजधानी दिल्लीला परकीय आक्रमणाचा
सतत धोका होता म्हणून मोहम्मद बिन तुगलक यांनी राजधानी दिल्लीहून देवगिरीवर आणली
परंतु त्याचा हा प्रयोग पूर्ण फसला
बहामनी
राज्य
महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना हसन गंगू बहामनी यांनी केली तो
या राज्याचा मूळ संस्थापक होय त्याचे राज्य विदर्भ पासून ते दक्षिणेस कृष्णा
नदीपर्यंत होते मोहम्मद गव्हाण हा शूर मुत्सद्दी सरदार या राज्याची सूत्रे सांभाळत
होता त्याच्या मृत्यूनंतर बहामनी राज्याचे पाच तुकडे पडले
वराड
- इमादशाही
अहमदनगर- निजामशाही
बिदर
-बरीदशाही
गोवळकोंडा- कुतुबशाही
विजापूर- आदिलशाही
वऱ्हाडची इमादशाही
इमादशहा हे तेलंगी ब्राह्मण विजयनगर बरोबर
चाललेल्या लढाईत तो मुसलमानांच्या हाती
सापडला त्यास मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात आली पुढे त्यास मोहम्मद गवानाच्या
मेहरबानी ने इमाद मुल्क हा किताब मिळाला त्याने इमादशहा नाव धारण करून स्वतंत्रपणे
राज्यकारभार सुरू केला इसवीसन १५७२ मध्ये
मूर्तझा निजामशहाने इमादशहाच्या वंशजाला ठार करून वरचे राज्य निजामशाहीत विलीन
केले
अहमदनगरची
निजामशाही
मलिक
नाईब निजाम उल मुल्क हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण पुढे त्याने इस्लाम धर्म
स्वीकारला त्याचा मुलगा अहमद याने अहमदनगरच्या निजामशाही ची स्थापना केली दौलताबाद
ते जुन्नर या मार्गावर हे छोटे खेडे होते त्या ठिकाणास अहमदनगर हे नाव देऊन नवीन
शहर वसवले चांदबिबी निजामशाहीचे संरक्षण करून दक्षिणेच्या इतिहासात आपले नाव
अजरामर करून गेली
विजापूरची
आदिलशाही
विजापूरची आदिलशाही हे राज्य युसुफ आदिलशहा या ने १४८९ मध्ये स्थापन
केले पुढे हे राज्य दोनशे वर्षे टिकले दिल्लीचा बादशहा औरंगजेब ने ते राज्य सन १६८६
मध्ये जिंकून घेतले
मुघल
कालखंड
संपूर्ण भारतात मोगलांचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते दक्षिण
भारतातील विशिष्ट महाराष्ट्रातील अहमदनगर व खान्देश ही स्वतंत्र राज्ये आपल्या
अधिपत्याखाली आणण्याची सम्राट वरची राजकीय महत्वकांक्षा होती अहमदनगर खान्देश
यांनी अकबराचे सार्वभौमत्व शिकण्याचे मान्य केले अहमदनगरच्या राणी चाँद विने
अकबराची आदेश धुडकावून लावले म्हणून सम्राट अकबराने शहाजान मुराद व अब्दुर्रहीम
खान यांना अहमदनगर जिंकण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले त्यावेळी चांदबीबी अहमदनगरचा
कारभार सांभाळत होती तिने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला पण तिचा प्रयत्न असफल झाला
आपला पराभव टाळण्यासाठी तिने मुलांबरोबर तह केला या तहानुसार समृद्ध वऱ्हाड प्रांत
मोगल साम्राज्यात विलीन झाला
शहाजहान
व महाराष्ट्र
अकबराचे
अहमदनगर जिंकण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा जहांगीरने बराच काळ
यशस्वी प्रयत्न केला शेवटी १६१६ शहा खुर्रम यास स्वारीवर पाठवले त्यावेळी मलिक
अंबर हा मुस्लिम सरदार निजामशाहीचा कारभार सांभाळत होता १६२७ मध्ये जहांगिरा चा मृत्यू झाला त्याचे दक्षिण
धोरण अपयशी ठरले त्याच्या काळात मुघल सत्तेचा विस्तार फारसा झाला नाही शहाजीराजे
भोसले यांनी शहाजान विरुद्ध युद्ध पुकारले कोकणपट्टीवर शहाजीराजांची सत्ता
प्रस्थापित झाली शेवटी १६३६ मध्ये
शहाजीराजांचा पराभव होऊन निजामशाहीचा शेवट झाला
धार्मिक
जीवन :
सम्राट अकबराने उदार धार्मिक धोरणाचा अवलंब
केला हिंदूंवरील जाचक जिया व तीर्थयात्रा कर्त्याने रद्द केला राज्यकारभारात
हिंदूंना सन्मानाच्या जागा दिल्या सम्राट जहांगीर यानेही उदार धोरण पुढे चालू
ठेवले सम्राट शहाजहान मात्र संकुचित धोरण अवलंब करणारा निघाला हिंदू तीर्थयात्रा कर
बसवला सम्राट औरंगजेब हा धर्मवेडा होता कलेचा राजाश्रय काढून घेतला सण-उत्सव
हिंदूंवर जिझिया कर लादला परिणामी हिंदू-मुस्लीम यांच्या दुरावा वाढत गेला
शीख धर्म गुरु गुरुतेज बहादुर यांना पकडून
औरंगजेबाने इसवीसन १६७५ मध्ये ठार केले त्यानंतर गुरुगोविंद गुरुपदी आले त्यांनी आपल्या अनुयायांची खालचा दल ही लढाऊ संघटना स्थापन केली गुरुगोविंद सिंग
नांदेड मुक्कामी असताना इसवीसन १७०८ मध्ये दोन पठाणाकडून त्यांची हत्या झाली
गुरुगोविंद सिंग याच्या अनुयायांनी नांदेड येथे गुरुद्वारा ची निर्मिती केली
सामाजिक
व सांस्कृतिक जीवन
हिंदू-मुसलमान
हे धार्मिक दृष्ट्या हे भिन्न होते. तरीसुद्धा सामाजिक पातळीवर त्यांच्या त्याच्या
विचारांची देवाण-घेवाण होत होती. काही चालीरीती मुसलमानांनी स्वीकारल्या तर मुस्लिमांच्या काही चालीरीती हिंदूनीही
स्वीकारल्या तुर्की अरबी फारशी व मराठी या
चार भाषा यांच्या मिश्रणाने दखनी उर्दू या भाषेची जडणघडण झाली सुलतान इब्राहिम
आदिलशहा सरस्वती व गणेश भक्त होता त्याने नवरसनामा हा ग्रंथ लिहिला तसेच शिव व
गणेशाची कवणे केली महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने शेख महंमद यास संत म्हणून स्वीकारले
0 Comments