महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड


                                       मराठा कालखंड
                                                      (1630-1818)

  युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली महाराजांनी मराठी माणसाची संघटन करून स्वातंत्र्याच्या विचाराने भारावून टाकले मराठ्यांच्या इतिहासाची दोन कालखंड पडतात
1) शिवशाही
2)  पेशवाई
पेशवे कालखंडात मराठी सत्तेचा विस्तार झाला

राजकीय परिस्थिती
  शहाजीराजे भोसले कर्तबगार  मराठा सरदार शहाजीराजे भोसले यांनी मुघल व आदिलशाही सत्ता पासून निजामशाही वाचवण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही इसवी सन १६३६  मध्ये निजामशाहीचा शेवट झाला यानंतर शहाजीराजे

आदिलशाही ही सेवेत रुजू झाले पुणे- सुपे- चाकण- इंदापूर ही त्यांची मूळची जहागिरी त्यांच्याकडे ठेवण्यात आली त्याचबरोबरकर्नाटकामधील बंगळुरुच्या जहागिरीचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी राजांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण


   शहाजीराजे भोसले यांचा विवाह लखुजी जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाला त्यांचे पोटी 19 फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचे बालपण खडतर होते आई जिजाऊ यांनी शिवाजीराजांना रामायण-महाभारत इत्यादींमधील कथांचा परिचय  करून दिला मराठी संस्कृत व फारशी भाषेचे शिक्षण दिले अश्वरोहन, तलवारबाजी, दांडपट्टा, कुस्ती इत्यादींचे शिक्षण देण्यात आले

स्वराज्याची स्थापना
 पुणे सुपे चाकण इंदापूर जहागिरीचा कारभार शहाजीराजांनी जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्याकडे सोपवला. संभाजी कावजी, येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, मदारी मेहतर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मुरारबाजी देशपांडे, इत्यादी जिवाभावाचे सवंगडी शिवाजीराजांना मिळाले शिवाजीराजांनी रोहीडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली राज्यांनी इसवी सन १६४६  मध्ये तोरणा किल्ला जिंकून पुढे राजगड, कोंडाना, पुरंदर यासारखे महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले

छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही संबंध
   स्वराज्य विस्तारासाठी जावळीचा दुर्गम प्रदेश मिळवणे छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक वाटू लागले म्हणून इसवीसन १६५६ मध्ये  जावळीवर स्वारी करून आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांचा पराभव केला जावळी विजयाने स्वराज्याच्या कक्षा रुंदावल्या रायगड सारखा बुलंद किल्ला ताब्यात आला जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यातून गेल्याने आदिलशहाचा क्रोध अनावर झाला त्याने अफजलखान या बलाढ्य सरदारास शिवाजी राजांच्या बंदोबस्तासाठी पाठवले. दिनांक 10 नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट झाली
   भेट प्रसंगी अफजलखानाने दगा देताच प्रसंगावधान राखून अत्यंत चपळाईने महाराजांनी अफजलखानाला  ठार केले यानंतर महाराजांनी अल्प कालावधीतच पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाहीचा प्रदेश जिंकला
   पन्हाळगड सारखा अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ला परत मिळवण्यासाठी सिद्दी जोहर यास प्रचंड फौज देऊन आदिलशहाने पन्हाळ्यावर पाठवले महाराज पन्हाळ्यावर असताना सिद्धीने गडास वेढा दिला  वेढा दीर्घकाळ चालू राहिला दरम्यानच्या काळात शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला छत्रपती शिवाजी महाराज दुहेरी संकटात सापडले महाराजांना किल्ल्यातून बाहेर पडणे आवश्यक वाटू लागली जुलै १६६०  मध्ये रात्रीच्यावेळी निवडक सैन्यानिशी महाराज किल्ल्यातून बाहेर पडले त्यांनी विशाळगडाकडे दौड सुरू केली शत्रूने पाठलाग सुरू केला बाजीप्रभू देशपांडे यांनी निवडक सैन्यानिशी पावनखिंडीत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले प्रचंड धुमश्‍चक्री झाली महाराज विशाळगडावर पोहोचल्याचा तोफाचा इशारा मिळताच बाजीप्रभूंनी देह ठेवला

छत्रपती शिवाजी महाराज व मुघल संबंध
   स्वराज्यावर चालून आलेला व पुण्याच्या लाल महालात तळ ठोकलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले निवडक सैन्यानिशी महाराजांनी दिनांक 5 एप्रिल १६६३  मध्ये रमजान च्या दिवसात रात्री खानावर छापा टाकला महाराजानी शाहिस्तेखान वार केला पण तो बोटावर निभावला शाहिस्तेखानाची बोटे छाटली गेली खानाची बेइज्जती झाली औरंगजेबने अपयशी ठरलेल्या शाहिस्तेखानाची बंगालच्या रवानगी केली
   शाहिस्तेखान तीन वर्षे स्वराज्याची लूट केली याचा बदला घेण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या वैभवशाली सुरत शहरावर स्वारी करण्याचे ठरवले महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरतेवर स्वारी केली यावेळी महाराजांनी तेथील सामान्य जनतेला व धार्मिक स्थळांना उपद्रव दिला नाही
   सुरत स्वारीमुळे औरंगजेबाची बेजती झाली मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सम्राट औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानाला प्रचंड फौज घेऊन दक्षिणेत पाठवले त्यांनी महाराष्ट्रात येऊन सर्व बाजूनी शिवाजी महाराजांना अडचणीत टाकले छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवित हानी टाळण्यासाठी जयसिंग यांबरोबर वाटाघाटी करून पुरंदरचा तह केला
   या तहाने मोगलांना तेवीस किल्ले व चार लक्ष होनांचा प्रदेश देण्याचे मान्य केले पूरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग याच्या प्रस्तावानुसार शिवाजी महाराज सम्राट औरंगजेबाच्या भेटीसाठी पुत्र संभाजी व निवडक विश्‍वासू सहकारी घेऊन आग्र्यास गेले  १२ मे १६६६ ला औरंगजेबाच्या वाढदिवशी ही भेट झाली यावेळी औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद केले
   19 ऑगस्ट १६६६  छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजीसह आग्र्याहून निसटले राजपुत्र संभाजीला मथुरेला ठेवून महाराज वेशांतर करून महाराष्ट्रात सुखरुप पोहोचले शिवाजी महाराज आपल्या हातून विसरल्याचे दुःख बादशहा औरंगजेब जन्मभर विसरू विसरू शकला नाही


शिवराज्याभिषेक


 महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली होती आपल्या राजसत्तेला धर्मशास्त्रीय कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी व समाज मान्यतेसाठी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले त्यानुसार ६ जून १६७४  रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला यावेळी छत्रपती ही पदवी धारण केली स्वतंत्र सार्वभौम राज्याचे ते छत्रपती झाले

कर्नाटक मोहीम
   राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम आपल्या हाती घेतली कर्नाटक मोहिमेसाठी कुतुबशहाने सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले तुंगभद्रा ते कावेरी पर्यंतचा मुलुख छत्रपतींच्या अधिपत्याखाली आला जिंजीचा किल्ला जिंकला त्यांच्यानंतर आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजी यांच्याशी सलोख्याची  बोलणी केली स्वराज्याचा विस्तार रायगडापासून जिंजीपर्यंत झाला शिवछत्रपतींच्या स्वराज्याने रयतेस अभिप्रेत असलेली राजसत्ता प्रत्यक्षात आणली 3 एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले

Post a Comment

0 Comments