छत्रपती संभाजी राजे जयंती
स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी राजे यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या रक्षणाचे अत्यंत कठीण कार्य ज्यांनी पूर्ण जीवानिशी आपल्या खांद्यावर घेतले. संपूर्ण आयुष्य जनतेचे रक्षण आणि स्वराज्यासाठी खर्ची केले, कोणतीही तक्रार , जबाबदारी न झटकता आपण छत्रपतीचे पुत्र आहोत, या विश्वासाने सलग ३२ वर्षे शत्रूशी लढत राहिये, अशा महान राजाची आज जयंती.
महाराष्ट्र, संतांची भूमी , महाराष्ट्र कष्ट करणाऱ्यांची भूमी, पण या भूमीतील अनेकजण परकियांच्या चाकर्या करण्यात गुंतले होते. स्वभिमान नव्हता की, अभिमान. याच शांत महाष्ट्राच्या मनात चैतन्य विश्वास आणि स्वाभिमान मिर्माण करण्याचे महान कार्य श्री छत्रपती शिवरायांनी केले. यवनांची सत्ता मोडून स्वराज्य निर्माण केले. या कार्यात महाराजांना अनेक मर्द मावळ्यांनी मदत केली. वेळप्रसंगी प्राणाची आहुती दिली.
याच स्वराज्याची धुरा शिवरायानंतर स्माभाजी राजेंवर आली. चारी बाजूने शत्रू आणि स्वकीयांचा विरोध असतानाही शंभू राजेंनी स्वराज्य मोठ्या हिम्मतीने राखले. जीवनाच्या शेअव्त पर्यंत फक्त स्वराज्याचाच विचार मनी ठेऊन लढत राहिले. न कुणापुढे झुकले, ना कोणताही तह केला. अशा राजापुढे त्या औरंजेबाला हि झुकावे लागले. कपटाने पकडले गेले नाहीतर आजचा इतिहास काही वेगळाच लिहिला गेला असता. तब्बल ४० दिवस औरंजेबाने हाल हाल केले पण शेवट पर्यंत त्याच्यापुढे झुकले नाहीत.
आजच्या तरुण पिढीने श्री छत्रपती शिवाजी राजे व श्री छत्रपती संभाजी राजे यांचे आदर्श आपल्या समोर ठेवले पाहिजेत . कठीण परिस्थिती ही माणसाला नेहमी कणखर आणि मजबूत बनवत असते. संघर्ष हा प्रत्येकाच्याजीवनात असतोच . पण खचून न जाता येणाऱ्या संकटाला जर सामोरे गेला तर विजय निश्चित असतो. शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांची मनात दृढनिश्चय आणि आई जीजाउंचा आशीर्वाद पाठी होता. आजच्या तरुणांनीही नुसत्या तू व्हीलर वर शिवरायांचे फोटो आणि झेंडे लावून फिरत न बसता, कोणतेतरी ध्येय समोर ठेऊन ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. स्वताच्या पायावर उभे राहून समाजात आपली आणि आपल्या आई- वडिलांची मान कशी उंचावेल यासाठी प्रयत्न करावेत. क्षणभंगुर गोष्टींमध्ये न अडकून पडता आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे.
शिवराय, शंभूराजे यांचा वारसा लाभलेली आपण तरुण महाष्ट्राच्या मुलांनी हा वारसा जतन करून याची ख्याती , कीर्ती संपूर्ण जगभर पसरवावी. सारे जग आपल्या राजांची कीर्ती गिल, गुणगान करेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज UPSC सारख्या परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या मुलांचा पास होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. आज मराठी माणूस सर्व क्षेत्रात मागे हटताना दिसतोय. याचे कारण आणि उपाय आपल्याच शोधायचे आहे. मित्रांनो [प्रत्येक गोष्टीला काही काळ मार्याधा असतात . जर एकदा वेळ निघून गेली की परत कोणतेच औषध लागू होत नाही. आज जर आपण निवांत आणि गाफील राहिलो तर उद्या आपल्याला आपल्याच राज्यात राहता येणार नाही.
स्पर्धा परीक्षा असोत, किंवा जीवनातील इतर काठी प्रसंग नेहमी आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श असला पाहिजे. खर तर त्यांनी जे भोगले , सोसले, जेवढे कष्ट केले. तेवढे आज आपल्याला करावे लागत नाहीत. सर्व काही आपल्याला सहज प्राप्त होते. तरीही फक्त कष्ट न करण्याच्या प्रवूत्तीमुळे, अआज आपण मागे पडत आहोत. परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन श्रीमंत होत आहेत आणिआपण मौज मस्ती करण्यासाठी सर्व घालवत आहोत. मी कोणाच्याही विरोधात नाही. आपण जर आपले कर्तव्य ओळखून काम केले तर कोणीच आपल्या छातीवर नाचणार नाही.
आज जे संकट महाराष्ट्रावर जगावर आले आहे त्यातून एकच निष्पन्न होते की पैसा हाच सर्व काही नाही. आपले आरोग्य जेवढे सदृढ तीच आपली खरी संपती . सदृढ शरीरात सदृढ मनाचा वास असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या . गरजूंना मदत करा. एक दिवस तेहि संकट काळी मदत करतील.
मित्रानो आज या जयंती निमित्त सर्व जन संकल्प करूयात की आपण सर्वांनी मिळून या स्वराज्याचा वारसा जतन करून तो असाच वाढता ठेऊया. हीच संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त खरा मनाचा मुजरा असेल.
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !
0 Comments