बाबा पद्मनजी
१] जन्म बेळगाव येथे १८३१ मध्ये झाला.
२] त्यांचे आडनाव मुळे होते त्यांचा जवाहिर्यांचा व्यापार होता. घरचे वातावरण
धार्मिक असल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार सांगली झाले होते.
३] वडील बेळगावात सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची शिक्षण तेथील
मिशनरी स्कूलमध्ये झाले पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईत झाली तेथे त्यांनी
इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड अशा भाषांचाअभ्यास केला
४] मुंबई त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
त्याचबरोबर त्यांना ख्रिस्ती धर्माचे शिक्षण ही मिळाले.
ख्रिस्ती धर्मातील मानवतावाद या मुलीचे ख्रिस्ती धर्माकडे
परिणामी १८५४ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला
५] त्यांनी समाजातील चालीरिती खोट्या कल्पना बंद व्हावेत म्हणून
जागृतीचे कार्य सुरू केले. त्यांचा मूर्तिपूजा व जातीभेदास विरोध होता
ठे परमहंस सभेची सक्रिय सदस्य बनले.
६] विधवा पुनर्विवाह चे पुरस्कर्ते होते
७] त्यांनी मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही लिहिली
८] या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली
९] त्यांचे आत्मचरित्र अरुणोदय होय
इंग्रजी- मराठी, संस्कृत- मराठी शब्दकोश लिहिलेले
१०] इसवी सन १९०६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला
****************************************
विष्णुशास्त्री पंडित
१] विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म इसवी सन १८२७ मध्ये सातारा
येथे झाला
२] इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक
३] या वृत्तपत्रातून सुधारणावादी मते निर्भिडपणे मांडली
४] विष्णू शास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सेवेची स्थापना
केली
५] ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवाविवाह या
ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला
६] निवडक ग्रंथ- ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या,
विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व
धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश.
७] मृत्यू इसवीसन १८७६ मध्ये.
**************************************
सार्वजनिक काका
१] सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून
सार्वजनिक का त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे
२] गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका
३] जन्म ९ एप्रिल १८२८ सातारा येथे
४] नोकरीनिमित्त पुण्याला, थोड्या दिवसांनी नोकरी सोडली. पुढील शिक्षण
पुण्यात घेऊनच त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला
५] भारताच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर
मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी
यांच्या अध्यक्षतेखाली १८७० मध्ये स्थापन झाली
६] न्यायाधीश रानडे सार्वजनिक काका यांनी सारांश सार्वजनिक सभेला
सामाजिक व राजकीय स्वरूप दिले
७] सार्वजनिक काका यांचा मृत्यू २५ जुलै १८८० रोजी झाला
****************************************
डॉ. रा. गो. भांडारकर
१] प्रार्थना समाजाच्या स्थापनेत रा गो भांडारकर असल्यामुळे संपूर्ण
महाराष्ट्राला परिचित आहेत
२] रामकृष्ण गोपाळ भांडारकर पूर्ण नाव
३] जन्म ६जुलै १८३४ मालवण सिंधुदुर्ग
४] पुर्वीचे आडनाव पक्की असे होते
५] परंतु पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे
उपनाव मिळाले
६] मुंबई विद्यापीठातून पदवी जर्मन विद्यापीठाची पीएचडी मिळाली
७] ग्रंथसंपदा- अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन, वैष्णवीझाम,शैविझम अंड अदर
मायनर रिलिजन्स , हिस्ट्री ऑफ इंडिया
८] मृत्यू २४ ऑगस्ट १९२५.
***************************************
गो. ग. आगरकर.
१] पूर्ण नाव गोपाळ गणेश आगरकर
२] जन्म- १४ जुलै १८५६ टेंभू ,कराड, सातारा.
३] १८७५ मॅट्रिक परीक्षा पास
४] विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू
इंग्लिश स्कूलची स्थापना
५] लोकमान्य टिळकांच्या मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू
६] केसरीचे संपादन आगरकर करत होते
७] लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन
सोसायटीची स्थापना केली या संस्थेच्या वतीने फर्ग्यूसन कॉलेज
सुरू करण्यात आले त्याच कॉलेजची ते प्रिन्सिपॉल होते
८] आगरकरांनी केसरी सोडून सुधारक हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी
सुरु केले
९] आगरकरांनी बुद्धीब्राह्मणाच्या आधारावर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार
केला. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरला व्यक्ती विकासातून समाजाचा विकास
होतो असे त्यांचे मत होते
१०] बालविवाह, जातीभेद, केशवपण,धार्मिक गोष्टीच्या नावावर चाललेल्या
गैर प्रकारांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला
११]ग्रंथसंपदा- केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील विवेचक लेख, वाक्यमीमांसा,
वाक्याचे पृथक्करण. इत्यादी
१२] मृत्यू -१७ जून १८९५
****************************************
पंडिता रमाबाई
१] जन्म - २३ एप्रिल १८५८ गंगामुळे, मंगळूर, कर्नाटक
२] सोळाव्या वर्षी त्यांच्या आई वडील यांचा मृत्यू.
३] पंडिता रमाबाई व बंधु श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा
निर्णय घेतला सहा वर्षाच्या ब्रह्मना नंतर ते कलकत्ता दाखल झाले
४] तेथे आपल्या पंडित यांनी व संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क
केले लोकांनी त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या देऊन गौरविले
५] १८८२- आर्य महिला समाजाची स्थापना
६] १८८९- शारदा सदन ची स्थापना मुंबईत
७] १८९०- शारदा सदन चे स्थलांतर पुण्याला
८] शारदा सदन च्या सल्लागार मंडळात न्या रानडे, न्या. तेलंग, डॉक्टर
भांडारकर इत्यादी थोर व्यक्ती होत्या
९] केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था सुरु केली
१०] १८९७ च्या दुष्काळात जनतेला मदतीचा हात
११] ग्रंथसंपदा- बायबलचे मराठीत भाषांतर, स्त्री धर्मनीती, दी हाय
कास्ट हिंदू मन इत्यादी
१२] मृत्यू ०५ एप्रिल १९२२.
****************************************
न्या. म. गो. रानडे
१] पूर्ण नाव- महादेव गोविंद रानडे
२] जन्म- १८ जानेवारी १८४२ नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे
३] प्राथमिक शिक्षण कोल्हापूर मुंबई येथे पुढील शिक्षण
४] एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी, इतिहास विषयाचे प्राध्यापक
५] पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले ते कायदे मंडळाचे सदस्य होते
६] त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले
७] त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला
८] हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली
९[ समाजकारण-राजकारण इत्यादी क्षेत्रात त्यांनी वैचारिक योगदानाने
जागृत घडविण्याचे कार्य केले
१०] मृत्यू- १६ जानेवारी १९०१.
=======================================================================
0 Comments