महाराष्ट्रातील
समाज सुधारक
1] जगन्नाथ शंकर शेठ (१८०३ ते १८६५)
मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ
उर्फ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते.
जन्म
१०
फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील
मुरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतिचा वापर समाज सुधारण्यासाठी केला. व्यापारामुळे
इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.
शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही, हे
ओळखून एल्फिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ स्थापना केली. या सोसायटीने मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक
सोसायटीच्या’ स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली. सरकारने मुंबई
इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन ची
स्थापना केली. त्याचे सदस्यत्व बहाल केले. त्याचेच पुढे रूपांतर शिक्षण खात्यात झाले.
जनतेची दुखे सरकारचे निदर्शनास आणण्यासाठी
दादाभाई नौरोजी यांच्यासमवेत यांनी, ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली नाना मुंबईच्या
कायदेमंडळात सदस्य होते. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकाना त्यांनी मदत
केली आणि त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आचार्य अत्रे
त्यांच्याविषयी म्हणतात, नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते
मृत्यू ३१ जुलै
१८६५ .
मध्ये झाला.
2] आचार्य
बाळशास्त्री जांभेकर (१८१२ ते १८४६)
जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर
तालुक्यातील पोंभुर्ले येथे ६ जानेवारी १८१२ रोजी झाला. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी
मिळालेली होती. संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारशी, आधी भाषा त्यांना
आत्मसात होत्या. इतरही विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. शिक्षण पूर्ण
झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या
महत्त्वाच्या पदावर रुजू झाले सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराज यांचे शिक्षक
झाले.नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. मुंबई प्राथमिक शाळा
निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती
केली. त्यांनी इतिहास, भूगोल, गणित इत्यादी विषयांवर आणि हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन
इतिहास , सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले याशिवाय ज्ञानेश्वरीचे
पाठ्भेदासह संपादन केले
वृत्तपत्र हे समस्या जागृतीचे अत्यंत
महत्त्वाचे साधन आहे याचा मागोवा घेऊन १८३२ मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले व दिग्दर्शन हे मासिक सुरू केले
आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक,इतिहास संशोधक, सुधारणावादी, शिक्षण तज्ञ,
ज्येष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक, म्हणून जांभेकर यांचा सन्मान
केला जातो. त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला .
3] दादोबा
पांडुरंग तर्खडकर (१८१४ ते १८८२ )
मराठी भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे
व्याकरणकार, म्हणून परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इसवी सन ९ मे
१८१४ मध्ये झाला. त्यांना
मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते .शिक्षण पूर्ण करून जावरा
संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना एलफिस्टन संस्थेत
सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. १८३६ ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्त झाली. १८५२ मध्ये
डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली भिल्लांचा त्यांनी बिमोड कुशलतेने
केला म्हणून इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली.
आपल्या
समाजातील दोष उणीवा यांची त्यांना जाणीव होऊ लागली या जाणिवेतूनच १८४४ मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम
मंशाराम, दीनवाणी शंकर, दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानवधर्म सभा संस्था स्थापन केली. ईश्वर एक
आहे मनुष्यमात्राचे जात एक आहे, परमेश्वरासाठी भक्ती करावी सर्वांशी समानतेने
वागावे. इत्यादी उदात्त तत्त्वांचा पुरस्कार केला. परंतु कार्यकर्त्यांच्या
अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर निकोबा चव्हाण. राम
बाळकृष्ण जयकर. यांच्या मदतीने दादोबा यांनी मुंबई येथे १८५९ मध्ये परमहंस सभा
स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. त्यांचा
मृत्यू इसवी सन १७ ऑक्टोबर १९८२ रोजी झाला
0 Comments