महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास

                                                                वाकाटक घराणे


अजिंठा लेणी मध्ये वाकाटकाना ''वाकाटक वंशकेतू'' असे म्हटले आहे वायुपुराण व बिदर  ताम्रपटातून ''विंध्यशक्ती'' याला वाकाटक घराण्याचा संस्थापक म्हटले आहे.  त्याच्या मृत्यूनंतर पुत्र प्रथम प्रवरसेन यांनी इस. 270 ते  इस. 330 पर्यंत साठ वर्षे राज्य केले.  हा या घराण्यातील सर्वात बलशाली राजा होय.  त्याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल,  कलिंग व आंध्र हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला.  

      त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची विभागणी गौतमीपुत्र व सर्व सेवा या पुत्रांमध्ये झाली. 


ज्येष्ठ शाखा :

प्रवरसेन पुत्र गौतमीपुत्र याचा मुलगा पहिला रुद्रसेन जो समुद्रगुप्ता चा समकालीन होता.  समुद्रगुप्ता शी याने सलोख्याचे संबंध ठेवले यानंतर याचा पुत्र पृथ्वीसेन राजा बनला.  त्यांनी आपला मुलगा दुसरा रुद्रसेन याचा विवाह दुसरा चंद्रगुप्ताची  कन्या प्रभावती गुप्तशी केला  व राजधानी नागपूर जवळ नंदिवर्धन येथे आणली. इसवी सन 490 च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा वत्सगुल्म शाखेत झाली. 



वस्तगुल्म शाखा :


पहिल्या प्रवरसेन चा पुत्र द्वितीय सर्वसेन याने राजधानी वत्सगुल्म (सध्याचे वाशीम ) येथे स्थापन केली. 
त्याने धर्म राज हि उपाधी घेऊन '' हरिविजय '' हा प्राकृत काव्य रचले.


कवी कालिदास अनेक वर्षे येथे होते त्यांनी 'मेघदूत' ची रचना येथेच केली. 


****************************************************
                                        बदामीचे चालुक्य 

पहिला राजा ' जयसिंह ' होय. 'पहिला' पुलकेशी' या घराण्यचा बलशाली राजा होय. 

किर्तीवार्मान राजाने ११ वर्ष्यांच्या काळात कदंब व नल  राजाचा पराभव केला. 

दुसरा पुलकेशी याने मौर्य, कलचुरी, नल , राष्ट्रकुट,कदंब, गंग , आलूप, यांचा पराभव करून महाराष्ट्र , कोकण, माळवा, विदर्भ इ. प्रांत जिंकले. 


चालुक्यांचे योगदान :


चालुक्य कला, साहित्य,विद्येचे उपासक होते. 

कवी '' बिल्हण'' चे 'विक्रमांक देव्चारीत', '' विज्ञानेश्वाराचे'' 'मिताक्षरा', पंपाचे 'पंपरामायण', इ. ग्रंथाची निर्मिती झाली. 


बदामी, हम्पी, ऐहोळ,श्रवणबेळगोळ, येथील मंदिरे यांच्या स्थापत्य कला दर्शवतात

********************************************************************************


                                                               राष्ट्रकुट घराणे 


चालुक्य घरानेच्या  अस्ता नंतर  इ.स. ७५३ च्या सुमारास राष्ट्रकुट राजे महाराष्ट्रावर सत्तारूढ झाले. 


दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक राजा होय. 

दंतीदुर्ग नंतर त्याच चुलता 'कृष्ण प्रथम ' गादीवर आला. त्याने १८ वर्षे राज्य केले. कृष्ण प्रथम याने जगप्रसिद्ध 'कैलास मंदिर' बांधले. 





यानंतर जेष्ठ पुत्र गोविंद दुसरा व त्यानंतर राजा ध्रुव (धृवाधारावर्ष) गादीवर आले.

अमोघवर्ष हा साहित्यिक व शांतताप्रिय होता. याने ' रत्नमालिका; 'काविराज्मार्ग' हे ग्रंथ लिहिले. 


*****************************************************


                                                            शिलाहार घराणे 
शिलाहार प्रथम राष्ट्रकुट व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित होते. शिलाहाराची ३ सत्ताकेंद्रे होती. 

१] दक्षिण कोकणचे शिलाहार: 
या घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जिमुत वाहन हा असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूळ स्थान होय 
सोनेरी गरूड पक्षाचे चिन्ह हे जिमुत वाहन राजघराण्याच्या निशाणावर असलेले दिसून येते 

२]उत्तर कोकणच्या शिलाहार :


दक्षिण कोकणच्या शिलाहार पेक्षा कमी प्राचीन असलेले घराणे म्हणजे उत्तर कोकांचे शिलाहार होय. 

कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय 


३]कोल्हापूरचे शिलाहार घराणे :


शिलाहारांची तिसरे घराने कोल्हापूर, मिरज, कराड व कोकणच्या काही भागांवर राज्य करत होते.  सुवर्ण गरुड ध्वजाचे चिन्ह यांनीही राजकारण्याची निशाणी म्हणून वापरल्याचे दिसून येते. 
जतिग या घराण्याचा मूळ पुरुष होय. 

दुसरा भोज हा या घराण्यातील प्रसिद्ध राजा होऊन गेला यांनी बावडा ,भुदर्गड, खेळणा, पन्हाळा, पावनगड, सामनगड, व वाईजवळ पांडवगड असे पंधरा किल्ले बांधले


******************************************************

                                                गोंड घराणे


प्राचीन महाराष्ट्राच्या शेवटच्या काळात हून  व मुस्लीम आक्रमणांमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली याच काळात चांदा (चंद्रपूर) येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली 

ऐतिहासिक साधने :

१८६९  मध्ये मेजर लूसी स्मिथ  ने गोंड घराण्याचा इतिहास सर्वप्रथम प्रकाश टाकला. 
कोल भिल हा या घराण्याचा संस्थापक होय. 
एकूण 65 गोंड राजांनी अनेक शतके महाराष्ट्रातील देवगड नागपुर प्रदेशांवर राज्य केले














Post a Comment

0 Comments